केतकावळे येथे पार्किंग मध्ये लावलेल्या कार मधून सोन्याच्या दोन गंठणची चोरी
सासवड दि.२५
पुरंदर तालुक्यातील केतकावळे येथील बालाजी मंदिराच्या पार्किंग मधून कारमधील दोन गंठण चोरीला गेल्याची तक्रार सासवड पोलीस देण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील केतकावळे येथील बालाजी मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक तेजस्विनी विनोद पवार वय 29 वर्ष व्यवसाय डॉक्टर रा.स्वप्नगंधा कॉलनी, देवकर पानंद, कोल्हापुर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानीं दिलेल्या तक्रारी नुसार दिनांक 19/02/2022 रोजी सायंकाळी 5:30वा.ते दिनांक 19/02/2022 रोजी सायंकाळी 6:30वा.चे दरम्यान मौजे केतकावळे ता.पुरंदर जि.पुणे गावचे हद्दीत बालाजी मंदीर परीसरातील पार्कींगमध्ये लावलेल्या कारचा दरवाजा कोणीतरी अज्ञात चोरट्याने कशाने तरी उघडुन कारमध्ये ठेवलेले सोन्याचे दोन गंठण चोरून नेले आहेत. यामध्ये 75,000/- रू.किंमतीचे सोन्याच्या तारेतील लहान सोन्याचे गंठण तसेच 75,000/- रू.किंमतीचे काळ्या मण्यातील, व सोन्याच्या तारेतील मोठे सोन्याचे गंठण असा दीड लक्ष रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याबाबतचा अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गार्डी करीत आहेत.