माजी सरपंचाने केला १५ वर्षीय मुलीवर अत्याचार
पोस्को अंतर्गत गुन्हा दखल.
जेजुरी दि.२४
पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील माजी सरपंच ने अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. यासंदर्भात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 363,376 (3),376(2)(एन)506 लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, या संदर्भात पिढीत मुलीच्या आईने जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी स्वप्निल दत्तात्रय जगताप राहणार राजेवाडी याने पिढीत अल्पवयीन मुलीला फुस लाऊन तिच्या सोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले.17/02/2022 रोजी सकाळी 08:30 ते 09:00 वा.दरम्यान वाघापुर गावचे हद्दीत वाघापूर चौफुला रेल्वे स्टेशनच्या बाजूला मोकळा जागेत पिढीत मुलीला फुस लाऊन तिच्याशी अनैतिक सबंध ठेवले. त्याचं बरोबर फिर्यादी यांची मुलगी ही अल्पवयीन असताना सुद्धा आरोपीनेदि. दि.19/02/2022 रोजी कोणते तरी आमिष दाखवून फूस लावून तिला पळवून नेले आहे.सुरवातीला मुलीला पळवल्या बद्दल तक्रार देण्यात आली होती. मात्र नंतर लैंगिक अत्याचार झाल्याची माहीत पुढे आल्याने या गुन्ह्यात वाढ करून लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4 व 6 प्रमाणे वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपी हा राजेवाडी गावाचा माजी सरपंच आहे. त्यामुळे या बाबत परिसरात मोठी चर्चा आहे.गावचे कारभारीच मर्यादा पाळत नसल्याने लोकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.याबाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गावडे करीत आहेत.