पिंपरे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक मोटरसायकलस्वार ठार तर एक जण गंभीर जखमी
नीरा दि.२३
पुरंदर तालुक्यातील निरा जेजुरी दरम्यान पुणे पंढरपुर रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला.तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,आज दिनांक 23/ 2/ 20२२ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास निरा जेजुरी रोडवर हॉटेल ब्रह्मांड समोर एका अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिली यामध्ये मोटरसायकल क्रमांक एम एच 11 डी सी 55 52 वरील नितीन भगराम पंडित हा जागीच ठार झाला,तर संतोष भिमराव मुगासे हे गंभीर जखमी झाले हे दोघे राहणार वाई , जिल्हा सातारा येथील आहेत. अपघाताची माहिती मिळताच नीरा दूर्क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर, पोलीस नाईक राजेंद्र भापकर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन 108 अंबुलान्सच्या साह्याने जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. आणि मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. याबाबत अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुदर्शन होळकर करत आहे