कात्रज दूध संघाच्या निवडणुकीत भाजपचे गंगाराम जगदाळे यांचा अर्ज ठरला बाद.
काँग्रेस राष्ट्रवादीचे तानाजी जगताप यांची निवड निश्चित
सासवड दि.२२
पुणे जिल्ह्यातील कात्रज दूध संघासाठी पुरंदर तालुक्यातून विद्यमान संचालक व पुरंदर भाजपचे नेते असलेले उमेदवार गंगाराम जगदाळे यांनी अर्ज भरला होता .आज झालेल्या छाननीत जगदाळे यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामूळे आत काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार..तानाजी जगताप यांची निवड निश्चित झाली आहे .
कात्रज दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक पार पडते आहे आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्जची छाननी करण्यात आली. यामध्ये गंगाराम जगदाळे यांचा अर्ज बाद ठरल्याने भाजपला विषेतः बाबाराजे समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.दिवे गरडे मतदार संघामध्ये गंगाराम जगदाळे यांचे मोठे वर्श्चव आहे.हा गट अजूनही दादा जाधवराव यांचे पुत्र बाबाराजे जाधवराव यांच्या विचारांचा आहे.गंगाराम जगदाळे बाबाराजे यांचे कट्टर समर्थक समजले जातात.मागील तीन पंचवार्षिक ते कात्रज दूध संघाचे संचालक होते. जगदाळे यांचा अर्ज अनपेक्षितपने बाद झाल्याने काँग्रेस राष्ट्रवादच्या गटात आनंदोत्सव साजरा होत आहे.पुरंदर चे आमदार संजय जगताप यांच्या साठी ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.