पंचायत समिती पुरंदर व शिक्षणा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
नीरा दि.१७
पुरंदर तालुक्यातलं प्रत्येक केंद्र स्तरावर येथे आज दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पंचायत समिती पुरंदर व शिक्षणा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरे येथील केंद्रामध्ये यामध्ये राख, पिंपरे खुर्द,नाझरे क.प. नाझरे सुपे, पिसुर्टी इत्यादी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यानी सहभाग घेत विज्ञान प्रयोग सादर केले. तालुक्यात सहा केंद्र स्तरावर या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी शिक्षणा फाऊंडेशनचे महारष्ट्र राज्य कार्यकारी व्यवस्थापक निलेश जाधव, हवेली व दौंड तालुका समन्वयक कल्याणी पायागुडे,पुरंदर तालुका समन्वयक सुनील शेलार,सुवर्ण खराडे सारिका शिर्के, शुभम शेलार,निलेश गाडे अक्षय महापुरे यानी या स्पर्धेचे परीक्षण केले.
यावेळी विविध शाळांमधून आलेले शिक्षक मधुकर यादव, सुनील नेवसे,मेघराज कुंभार,योगेश राऊत भगीरथ निगडे,भाऊ नझिरकर,बाळू मोरे,सुनीता इंगळे, कल्पना निगडे, वर्षा पवार, धनश्री निंबाळकर रुपाली गायकवाड, इत्यादी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्र संचालन महादेव माळवदकर यांनी केले
तर आभार भाऊसो बरकडे यांनी मानले