अल्पवयीन मुलींवर बलात्काराचा प्रयत्न केल्या प्रकरणी शिवरी येथील एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दखल
जेजुरी दि.१३
पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील एका अल्पवयीन मुलींवर बलात्काराचा प्रयत्न केल्या प्रकरणी शिवरी येथील एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 354,पोस्को अंतर्गत गुन्हा दखल केला आहे.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की याबाबत शिवरी येथील महिलेने दिनांक ११ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली आहे.तिने दिलेल्या तक्रारी नुसार दिनांक २६/१/२०२२ रोजी रोजी रात्री १०:३० वाजलेच्या सुमारास मौजे शिवरी गावच्या हद्दीत फिर्यादीच्या घराचे पाठीमागे थोड्या अंतरावर त्यांच्याच भावकितील एका तरुण त्यांच्या ११ वर्षीय मुलीला घेऊन गेला.आणि तिच्याशी अश्लील वर्तन केले. यावरून त्यांनी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपगार करीत आहेत.