नीरेत बंद गोडावूनला आग
नीरा - दि.१०
पुरंदर तालुक्यातील नीरा येथील बाजारपेठेतील
जैनमंदीरासमोर असलेल्या जुनाट पद्धतीच्या लाकडी दरवाजे असलेल्या बंद गोडावूनला गुरूवारी (दि.१०) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत कोणतीही जीवतहानी झाली नसून अग्निशमन बंब, स्थानिक युवक व पोलिसांनी केलेल्या शर्थींच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आली.
या घटनेेबाबत नीरा पोलिसांनी व प्रत्यक्षदर्शनी पाहणा-यांनी दिलेली माहिती अशी की, गुरूवारी (दि.१०)
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नीरा - बारामती रोडवरील जैन मंदीराच्या समोर असलेल्या सुरेश हिरालाल शहा यांच्या मालकीच्या जुनाट पद्धतीचे लाकडी फळ्यांचे दरवाजा व लोखंडी पञा असलेल्या बंद गोडावूनला आग लागुन धूर येऊ लागला. त्यामुळे परिसरातील राहणा-या रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.या बंद गोडावूनसमोर कचरा पेटविला होता. त्यातील कचरा हवेने उडून आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शनी पाहणा-या नागरिकांनी सांगितले.
या घटनेची माहिती स्थानिकांनी नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, फौजदार कैलास गोतपागर यांना कळविताच त्यांनी तातडीने
ज्युबिलंट इन्ग्रेव्हिआ कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांच्याशी संपर्क साधून अग्निशमन बंबास
पाचारण केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळून आग विझण्यास मदत झाली.आगीमुळे बंद गोडावूनचे नुकसान होऊ नये याकरिता ज्युबिलंटच्या अग्निशमन बंबचे कर्मचारी निसार शेख, अमोल कड, स्थानिक युवक मंगेश ढमाळ व त्यांचे सहकारी , नीरा पोलिस दुरक्षेञाचे फौजदार कैलास गोतपागर, सहा.फौजदार सुदर्शन होळकर, पोलिस हवालदार संदीप मोकाशी , पोलिस नाईक निलेश करे यांनी आग विझविण्याकरिता शर्थींचे प्रयत्न केल्याने मोठे नुकसान टळले. दरम्यान, गोडावूनमधील भंगार स्वरूपाच्या वस्तूंना आग लागली होती. त्यामुळे किती नुकसान झाले हे समजू शकले नाही.