मोदींच्या त्या भाषणाचा संजय राऊत यांनी घेतला समाचार
मुंबई दि.९
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना महाराष्ट्र सरकारने कोरोना पसरवल्याचा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यात तीव्र पडसाद उमटत आहे. या आरोपावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचे वाईट वाटले. कोरोना प्रसाराबाबत केलेले आरोप हा महाराष्ट्रातील सरकारवर ठपका आहे. महाराष्ट्र सरकारने त्याविषयी बोलायला पाहिजे. महाराष्ट्राने ज्याप्रकारे कोरोना काळात कामगिरी केली त्याचे जगभर कौतुक केले. आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना काळात डॉक्टर,नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम केले. हा तर त्यांचा अपमान आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा उगम चीनमध्ये झाल्याचा खुलासा केला आहे. कोरोना निर्मूलनासाठी राबवलेल्या ‘धारावी पॅटर्न’चे कौतूकही जागतिक आरोग्य संघटनेने केले होते. परंतु पंतप्रधानांनी या प्रसाराचे खापर महाराष्ट्रावर फोडले. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या कामाचे पुरावे दिले होते. त्यावर महाराष्ट्रातील भाजप नेते का बोलत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.