युथ कार्निवल स्पर्धेसाठीच्या ऑडिशन मध्ये 300 स्पथकानी घेतला सहभाग
सासवड दि.१०
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र युथ कार्निवल अर्थात मायोका या स्पर्धे साठीच्या च पुणे ग्रामीण विभागाच्या ऑडिशन वाघिरे महाविद्यालय सासवड येथे घेण्यात आल्या असून या मध्ये 300 स्पर्धकांनी सहभाग घेतल्याची माहिती तालुका विध्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माहिती संदेश पवार आज 10 फेब्रुवारी रोजी माध्यमांना दिली आहे.
. सासवड येथील वघिरे महा विद्यालयात या ऑडिशन पार पाडत असताना याप्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे , पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे सर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीपजी कदम साहेब, माजी आमदार अशोक टेकवडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका पुजाताई बुट्टे पाटील , जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण शिंदे , राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते , पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील ,पुरंदर तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष पुष्कराज जाधव , पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण कोकणे , महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे , पुरंदर तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा गौरीताई कुंजीर , बंडूकाका जगताप, भानुदास जगताप, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पुरंदर तालुका अध्यक्षा सोनाली खेडेकर , युवा नेते ऋषी झेंडे, युवा नेते सयाजी वांढेकर, युवक राष्ट्रवादीचे सासवड शहर अध्यक्ष मनिष रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष व संचालकांचा सत्कार करण्यात आला.
या ऑडिशन चे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुरंदर तालुका अध्यक्ष संदेश पवार , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुरंदर-हवेली मतदारसंघाचे अध्यक्ष चेतन जाधवराव , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सासवड शहराध्यक्ष अतुल जगताप , वाघिरे महाविद्यालयाचे अध्यक्ष मयूर सुर्वे, वाघिरे महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष गौरव खेडेकर व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.