मुलीच्या लग्नाचा अवांतर खर्च टाळून राख येथील प्रकाश ताटे यांनी तालुक्यातील रुग्णासाठी दिली ॲम्बुलन्स .
पुरंदर दिनांक २३ जानेवारी
पुरंदर तालुक्यातील राख येथील रहिवासी असलेल्या व शिवसेनेचे नेते असलेल्या प्रकाश ताटे यांच्या मुलीचा विवाह आज संपन्न झाला. या विवाहाच्या वेळी प्रकाश ताटे यांनी अवांतर खर्च टाळून बचत झालेल्या पैशातून पुरंदर तालुक्यातील लोकांच्या सेवेसाठी ॲम्बुलन्स भेट दिली आहे.
राख येथील प्रकाश ताटे यांची कन्या योगिता प्रकाश ताटे व सातारा जिल्ह्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील श्रीजित संभाजीराव देशमुख यांचा विवाह आज दिनांक 23 जानेवारी रोजी संपन्न झाला या विवाहामध्ये अवांतर होणारा खर्च या दोन्ही कुटुंबांकडून टाळण्यात आला. त्यामुळे या विवाहामध्ये वधु पित्याचे जे पैसे बचत झाले होते . या पैशातून त्यांनी पुरंदर तालुक्यातील लोकांसाठी ॲम्बुलन्स सेवा उपलब्ध करून दिली. पुरंदरचे माजी आमदार व राज्याचे माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्या हस्ते आज विवाह स्थळी या ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दिलीप यादव, आदर्श माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बापूसाहेब भोर त्याचबरोबर अनेक वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती. प्रकाश ताटे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कौतुक केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या मुहूर्त साधून ताटे यांनी आपल्या मुलीचा विवाह आज 23 जानेवारी रोजी आयोजित केला होता. त्याचबरोबर ही ॲम्बुलन्स सुद्धा सुरू करण्यात आली.
खुपच छान उपक्रम👌
ReplyDelete