खवल्या मांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद : भोर आणि महाड वनविभागाचीसं युक्त कारवाई
भोर दि.९
भोर आणि महाड या भागात मांजराची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये वनविभागाने एका खुल्या मंदिरासह पाच आरोपींना अटक केली आहे.
याबाबत भोर वनपरिक्षेत्र विभागाचे अधिकारी दत्तात्रय भुसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार भोर आणि महाड वनविभागाच्या हद्दीवर खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांची टोळी असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाल्याने वनविभागाने गस्त वाढवून पाच जणांवर संयुक्त कारवाई केली.सद्या खवल्या मांजरासह पाच आरोपी वनविभागाच्या ताब्यात आहेत.
भोर-महाड वनविभागाच्या हद्दीवर वरंध घाटात वन्य प्राण्यांचा तस्करी होत असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वनविभागाने गस्त वाढवली.मात्र संबंधित संशयित महाड येथे असल्याची खबर मिळाल्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी भोर यांनी महाड वनविभाग यांना दूरध्वनी द्वारे संपर्क करून संयुक्तरित्या ही कारवाई केली.यावेळी गुन्ह्यात वापण्यात आलेल्या ३ दुचाकीही जप्त करण्यात आल्या.पुणे आणि रायगड या दोन्ही जिल्ह्याच्या सेमीवरील ही कारवाई उपविभागीय वन अधिकारी भोर आशा भोंग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस. आर.खट्टे वनरक्षक डीडी गुट्टे, एस .के.होनराव के. एम सी .हीमोने ये.एस .पवार यांनी केली.