वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरी पोलिसांची हॉटेल,परमिटरूम बार आणि लॉज चालकांना कलम १४९ नुसार नोटीस
जेजुरी दि.९
राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर पुणे जिल्हयात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे.त्यामूळे जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढू नये, म्हणून पोलिसांच्यावतीने खबरदारी घेण्यात येते आहे, त्यामुळे पोलिसांच्या वतीने आज दिनांक ९ जानेवारी रोजी कलम १४९ अन्वये जेजुरी पोलिसांच्या अंकित असलेल्या हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, परमिट रूम, बार चालक यांना नोटीस काढण्यात आली आहे. यानुसार लॉज, रेस्टॉरंट, परमिट रूम, बार इत्यादी ठिकाणी दोन डोस पूर्ण केलेल्या लोकांनाच प्रवेश देण्यात यावा. त्याचबरोबर क्षमतेच्या 50 टक्के लोकांनाच प्रवेश देण्यात यावा. असे त्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर शासनाच्या प्रचलित नियमाप्रमाणे रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत सर्व आस्थापना बंदरातील, हॉटेल रेस्टॉरंट मधील ज्या भागाचा वारंवार वापर केला जातो अशी ठिकाणे किंवा वस्तू निर्जंतुकीकरण करून घ्याव्यात. हॉटेल, रेस्टॉरंट, बार, परमिट रूम इत्यादी ठिकाणी आत आणि बाहेर जाण्याच्या ठिकाणी तर थर्मलस्कॅनिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करावा. अशा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था मालक किंवा व्यवस्थापक यांच्या मार्फत करण्यात यावी. या ठिकाणी नागरिक सामाजिक अंतर राखातील याची काळजी घ्यावी.
या ठिकाणी नियमांचा भंग होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यास त्या स्थापना तात्काळ बंद करण्यात येईल आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लॉज मध्ये क्षमतेच्या फक्त ५० टक्के लोकांनाच राहण्यास परवानगी देण्यात येईल. पूर्ण क्षमतेने लॉज भरलेले मिळाल्यास व कोरोना आजार पसरवणल्याचे निदर्शनास आल्यास अशा लॉज चालकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लॉज मध्ये येणाऱ्या व्हिजिटर चे आधारकार्ड /ओळखपत्र द्यावे. तसेच त्यांची नोंद व्हिजिटर रजीस्टर मध्ये करण्यात यावी. असे रजिस्टर पोलिसांनी तपासणी मागितले त्यांना ते द्यावे. त्याच्यावर नोंदी व्यवस्थित केलेल्या असाव्यात. त्याच बरोबर अशा ठिकाणी स्थापनेची क्षमता व उपस्थित लोक याची माहिती दर्शनी भागावर लावावी. जर याबाबत कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा हलगर्जी पणा झाला तर त्या आस्थापने विरोधात भारतीय साथरोग अधिनियम १८७८चे कलम १८८ , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व मुंबई पोलीस कायदा कलम 33 डब्ल्यू प्रमाणे तसेच प्रचलित इतर अधिनियम व नियमान्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची नोंद सर्वांनी घ्यावी असे पोलिसांनी नोटीसित म्हटले आहे. त्याचबरोबर ही नोटीस न्यायालयामध्ये पुरावा म्हणून सादर करण्यात येईल असेही त्यामध्ये म्हटले आहे. जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी यासंदर्भातील नोटीस आज जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध आस्थापनांना दिली आहे.