निरा शहरात चिंता वाढली.
निरेतील विविध प्रभागात कोरोनाचे ५ रुग्ण.
नीरा दि.१०:
पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठ्या निरा शहरात सोमवार (दि.१०) रोजी १३ व्यक्तींची कोरोनाची एँटीजन चाचणी करण्यात आली, पैकी ५ व्यक्तींचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत. निरा प्राथमिक आरोग्य केंद्र एकुण ४४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली, ३१ व्यक्तींची आर.टी.पी.सी.आर, तर १३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली. आर.टी.पी.सी.आर. तपासणीचे अहवाल प्रलंबित असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सांगण्यात आले.
राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासशाने निर्बंध कडक केले. काल पर्यंत पुरंदरच्या शहरी भागात एखद्या व्यक्तीचा कोरोना अहवाल बाधित येत होते. आज सोमवारी सासवड ग्रामीण रुग्णालयात ११७ व्यक्तींचे एँटीजन तपासणी केली गेली या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नारा शहरात मात्र ऐकाच दिवशी ५ व्यक्तींचे अहवाल बाधीत आल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहे. ५ बाधितांपैकी निरेतील प्रभाग एक मधिल १, प्रभाग दोन मधिल ३,तर प्रभाग सहा मधिल १ व्याक्तीचा असे ५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. निरा व परिसराला ही चिंताजनक बाब आहे. कोरोना अजून गेला नसून नागरिकांनी यापुढेही काळजी घेणे घेणे जरूरीचे आहे, असे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सांगितले जात आहे.