हडपसर नीरा बस मार्गावर जादा बस सोडण्याची नीरेचे उपसरपंच राजेश काकडे यांची मागणी.
नीरा दि.२६
पुरंदर तालुक्यातील हडपसर ते निरा या मार्गावर पीएमपीएलएमने २१ जानेवारीपासून बस सेवा सुरू केली आहे. ग्रामीण भागातील लोकांना या बस सेवेचा चांगला उपयोग होतोय. मात्र सध्या येत असलेली बसची संख्या अपुरी पडत असून बसच्या फेऱ्या आणखी वाढवाव्यात अशी मागणी निरेचे उपसरपंच राजेश काकडे यांनी केली आहे
पुरंदर तालुक्यातील नीरा पर्यंत पीएमपीएलएमची बस सेवा सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सध्या अजूनही एसटी बस सुरू नाहीत निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. लोकांना नीरा हे ठिकाण मध्यवर्ती पडत असल्याने या ठिकाणी पुण्याला जाण्यासाठी लोक येत असतात. त्यामुळे या ठिकाणाहून प्रवाशांची मोठी आवक-जावक असते. पीएमपीएलएम बस सेवा सुरू झाल्यामुळे या बसने प्रवास करण्यास अनेक जण पुढे सरसावले आहेत. त्यामुळे बस नीरा येथेच पूर्ण भरते अनेकांना उभे राहूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे रूट वरील गावातील लोकांना बस मध्ये जागाच मिळत नाही. पिंपरे, पिसुर्टी दौंडज,वाल्हे या गावातील लोकांना या बसमध्ये जागाच मिळत नाही. त्यामुळे आता बसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी लोकांकडून होते आहे. आज दिनांक २६ जानेवारी रोजी उपसरपंच राजेश काकडे यांनी याबाबत प्रवाशांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी बसच्या फेऱ्या आणखी वाढविण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे योगेंद्र माने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे नीरा ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण इत्यादी उपस्थित होते.