२८ फेब्रुवारीला होणार पारगाव येथील भुयारी मार्ग वाहतुकीस खुला.
अमोल बनकर यांच्या उपोषणाला यश.
सासवड दि.३०
.......(प्रतिनिधी) अपंग विकास संघाचे अमोल बनकर यांनी उपोषण केल्याने रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले.१५ फेब्रुवारीला भुयारी मार्गाचे काम पूर्ण करून २८ फेब्रुवारीला भुयारी मार्ग वाहतुकीस खुला करू असे लेखी पत्र मिळाल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.
पिसर्वे पारगाव (तालुका पुरंदर)येथील रेल्वे क्रॉसिंग ठिकाणी वर्षभरापासून रेंगाळत सुरू असलेल्या भुयारी मार्गाच्या कामामुळे पूर्व भागातील नागरिकांची हेळसांड होत होती. रस्ता बंद असल्यामुळे अनेक शालेय विद्यार्थिनींना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे.शेतकरी,ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अपंग विकास संघाचे अमोल बनकर यांनी महात्मा गांधी जयंती दिवशी आमरण उपोषणाचा इशारा आठ दिवसांपूर्वीच दिला होता.
त्यानुसार रविवार(दिनांक, 30)रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला सुरुवात केली होती.याची तत्काळ दखल घेत रेल्वे प्रशासन व ठेकेदार यांनी उपोषणाला भेट देऊन उपोषणकर्ते अमोल बनकर यांची मागणी मान्य करून १५ फेब्रुवारीला भुयारी मार्गाचे काम पूर्ण करू. व २८ फेब्रुवारीला भुयारी मार्गातून वाहतूक सुरू करून देऊ असे लेखी पत्र दिले.तदनंतर नारळपाणी घेऊन बनकर यांनी उपोषण स्थगित केले. वर्षभरापासून रेंगाळत सुरू असलेल्या कामाबद्दल काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीस खुला करू असे लेखी पत्र ठेकेदार अथवा संबंधित प्रशासनाकडून मिळाले नव्हते. मात्र अपंग विकास संघाचे अमोल बनकर यांनी उपोषण केले व याची गंभीर दखल घेत संबंधित प्रशासन व ठेकेदार यांनी प्रत्यक्ष येऊन लेखी आश्वासन दिले. यामुळे पूर्व भागातील ग्रामस्थांनी अमोल बनकर यांचे कौतुक केले.
यावेळी गौरव कोलते, पुष्कराज जाधव , शिवाजी कोलते, आरुन कोलते, याकुब सय्यद, जालिंदर मेमाने, सर्जेराव मेमाने, राजेद्र भोसले हरिदास खेसे ऑड. राहुल कोलते, ऑड दयानंद कोलते, महेश राऊत, गौरव खेनट, तुशार जगताप, किशोर वचकल, जितेंद्र मेमाने, चंद्रकांत मेमाने, प्रथमेश कोलते, चंद्रकांत मेमाने, दर्वा दळवी यांच्या सह आनेक नागरिक उपस्थित होते.