खासदार येण्या आगोदराच शिवसैनिकांनी केले गुरोळी रस्त्याचे भूमिपूजन
सासवड दि.२८
पुरंदर तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमी पूजन व उद्घाटन आज बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात येतंय .मात्र यामध्ये आघाडी सरकारमधील शिव सेनेला बाजूला ठेवत काँग्रेस राष्ट्रवादीने विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला.त्यामूळे गुरोळी येथील रस्त्याच्या कामाचे भूमी पूजन शिवसैनिकांनी केले आहे
वाघापूर चौफुला ते गुरोळी गाव या रस्त्याच्या कामासाठी गुरोळी गावाचे उद्योगपती महादेव शिंगाडे यांच्यासह गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी विजय शिवतारे यांची गेल्या वर्षी भेट घेतली होती. शिवतारे यांनी ग्रामस्थांची ही समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आणि ऐन कोरोनाच्या काळात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला. गुरोळी रस्त्यासोबतच रावडेवाडी, कोडीत बु (धरणवस्ती), सोनोरी, चांबळी, सुपे खुर्द आदी रस्त्यांसाठी शिवतारे यांनी निधी मंजूर करून घेतला. असा दावा शिव सेनेकडून केला जातोय.
आणि म्हणूनच वाघापूर चौफुला ते गुरोळी या रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव आणि ज्योतीताई झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच उज्वला जाधव, राजेंद्र झेंडे, सुरेश खेडेकर, संदीप खेडेकर, संतोष खेडेकर, अविनाश जाधव, दादा खेडेकर, कैलास जाधव, सुनील जाधव, बाळासाहेब मचाले, नितीन कुंजीर, हिरामण खेडेकर, मनोज कुंजीर, विक्रांत पवार, प्रविण लवांडे, प्रल्हाद झिंजुरके, जालिंदर खेडेकर, दशरथ लवांडे, दादा खेडेकर, परशुराम खेडेकर, पोपट खेडेकर, निलेश खेडेकर, बाला खेडेकर, पंकज खेडेकर यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.