साकुर्डे येथून दोन लक्ष चोवीस हजाराच्या अल्युमिनियम वीज वाहक तारांची चोरी
जेजुरी दि.२५
पुरंदर तालुक्यातील साकूर्डे येथील अती उच्च दाबाच्या वीज वहिनीच्या अल्युमिनियमाच्या तारांची चोरी झाल्या प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे या संदर्भात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ४३७व भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम. १३७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जेजुरी पोलिसांनी आआज दिनांक २२ जानेवारी रोजी दिलेली माहिती अशी की,
पुरंदर तालुक्यातील साकुर्डे येथे जून २०१४ पासून ते दिनांक १९/१/२०२० रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत साकुर्डे गावच्या हद्दीत गट नंबर ९३ मधून २२४००० रुपये किमतीची ॲल्युमिनियमच्या अतिउच्चदाब वाहिनीची विद्युत वाहक दोन तारा अंदाजे १ किलोमीटर ,१०० मीटर लांबीची चोरीला गेली आहे. तसेच हार्डवेअर व इंसुलेटर याचे नुकसान केले आहे.या बाबत मुकुंद रंगराव लोखंडे यांनी दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबतचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मुत्तनवार करीत आहेत.