किती दिवस चालणार करोनाची तिसरी लाट ? आरोग्य तज्ज्ञांचा काय आहे अंदाज ? पहा....
पुणे दि. ९ :
देशात करोनाची तिसरी लाट सुरू झाली असल्याबद्दल अजूनही सरकार स्पस्त बोलत नाही. मात्र काही तज्ज्ञांनी हि लाट सुरू झाल्याचं मान्य केल आहे. हि करोनाची तिसरी लाट किमान तीन महिने चालेल, असा अंदाज आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
आज देश भरात
नवीन रुग्णांची संख्या ही १.६ लाखांच्या पुढे गेली आहे. त्याच वेळी
अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ८४ हजारांवर गेली आहे. दरम्यान, देशातील करोना रुग्णांची संख्या लवकरच शिगेला पोहोचू शकते. तसंच
सध्याची लाट ज्या वेगाने येतेय, तितक्याच वेगाने ती ओसरण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
अलिकडे ज्या भागात करोनाची रुग्णांची
संख्या वाढली आहे, तिथे ३ महिन्यांत रुग्णांची संख्या कमी
होऊ लागेल. देशात ५० टक्क्यापेक्षा जास्त ओमिक्रॉनचे रुग्ण हे फक्त मोठ्या
शहरांमध्ये आढळत आहेत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे अतिरिक्त
संचालक डॉ. समीरन पांडा यांनी शनिवारी सांगितले.
करोनाच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ. एन. च्या. अरोरा यांनीही करोनाची तिसरी लाट शिगेला कधी पोहोचेल? याची माहिती दिली आहे. ओमिक्रॉनचा जागतिक डेटा आणि गेल्या ५ आठवड्यांतील आपला अनुभव पाहता बहुतेक ओमिक्रॉनचा संसर्ग हा सौम्य आणि लक्षणे नसलेले असतात, असे डॉ. अरोरा म्हणाले.
रुग्णालयात दाखल करण्यात आलेले रुग्ण हे गंभीर आजार असलेले आहेत किंवा त्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. ओमिक्रॉन मुळे हॉस्पिटलायझेशन दर फक्त १ ते २ टक्के आहे. डेल्टा वेरियंटच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत हॉस्पिटलायझेशन हा दर खूपच कमी आहे, असे ते म्हणाले.
गेल्या २४ तासांत देशात करोनाचे १.५९ लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सुमारे ५ लाख नवीन रुग्ण एकाचवेळी आढळून आले, तर तिसरी लाट आल्याचे संकेत आहे, असे डॉ. अरोरा यांनी सांगितले. ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढेल, तशी करोना रुग्णांमध्ये घट होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.