Type Here to Get Search Results !

अनेक दिवसाच्या विश्रांती नंतर आज सासवड आगारातून बाहेर पडली पहिली लालपरी

 

अनेक दिवसाच्या विश्रांती नंतर आज सासवड आगारातून बाहेर पडली पहिली लालपरी



सासवड दि.१०

         एस.टी, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सासवडच्या आगारातच उभी असलेली पहिली बस आज सासावड येथिल आगारातून बाहेर पडली आहे . ही बस दादरकडे  रवाना झाली आहे. सासवड आगारातील कर्मचाऱ्यांनी या बसचे पूजन करून बस रवाना केली आहे .

      राज्यभरात एस.टी. कर्मचारी आंदोलन करीत आहेत. आंदोलकांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. पण एस.टी. महामंडळाचे सरकार मध्ये विलिनीकरण व्हावे. या मागणीसाठी कामचारी संघटना अडून बसल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची रक्तवहिनी  आसलेल्या एसटीची चाके फिरेनाशी झाली आहेत. सरकारकडून हे आंदोलन मोडीत काढून एसटीची सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरु आहे .याचाच एक भाग म्हणून आज सासवड आगारातून उपलब्द चालक  वाहकांच्या मदतीने सासवड ते दादर ही बस सेवा सुरु करण्यात आली आहे. आंदोलना नंतर सासवड आगारातून बाहेर पडणारी ही पहिलीच बस आहे. आज  दिनांक  १० जानेवारी रोजी  आगार व्यवस्थापक मनीषा ईनामके, स्थानक प्रमुख इसाक सय्यद, वाहतूक निरीक्षक दत्तात्रय भोसले, वाहतूक नियंत्रक गोकुळ होले, वरिष्ठ लिपिक प्रकाश मोरे, वाहक अश्विनी  शिंदे तसेच चालक झेंडे, हेड मेकॅनिक मदने  यांचे उपस्थितीत ही बस दादरला  रवाना करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies