Type Here to Get Search Results !

महिलांनी कोणत्याही प्रकारची हिसा सहन न करता जवळच्या व्यक्ती जवळ व्यक्त व्हावे

 

 महिलांनी कोणत्याही प्रकारची हिसा सहन न करता जवळच्या व्यक्ती जवळ व्यक्त व्हावे : 

 नीरा येथे मासू चे श्रीकांत लक्ष्मीशंकर यांचे प्रतिपादन



   नीरा दि.१०

                       आत्माहत्येने प्रश्न सुटत नाहीत तर महिलांनी कोणत्याही प्रकारची हिंसा सहन न करता जवळच्या व्यक्ती जवळ व्यक्त व्हावे :अन्याय सहन केल्याने अन्याय वाढत जातो, म्हणून महिलांनी आपल्यावर होणारे अन्याय व हिंसा निमूट पणे सहन न करता जवळच्या लोकांजवळ व्यक्त व्हावे. असे प्रतिपादन मासुमचे श्रीकांत लक्ष्मीशंकर यांनी नीरा येथे बोलताना केले आहे.

      पुरंदर तालुक्यातील नीरा पोलीस दूरक्षेत्रात आज दिनांक १० जानेवारी रोजी निरा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका  सत्यभामा म्हेत्रे व  आरोग्य सेवक बापूसाहेब भांडलकर यांचा कोरोन काळात जीवाची  पर्वा न करता कोरोना बाधितांची आहोरात्र  सेवा केली म्हणून त्यांचा महिला सर्वांगीण उत्कष मंडळ म्हणजेच मासूम  व ग्रामीण पोलिसांच्यावतीने नीरा दूर क्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. यावेळी महीलांवर होणाऱ्या “अन्याय अत्याचारास प्रतिबंध” या विषयावर श्रीकांत लक्ष्मी शंकर बोलत होते. यावेळी मासुमच्या कविता जगताप, सुनंदा खेडकर, तसेच नीरा गावातील दक्षता कमिटीच्या सदस्या  सुनिता भादेकर तसेच पिंपरे गावाचे पोलीस पाटील सोनावणे, निरेचे पोलीस पाटील राजेंद्र भस्कर,कर्नल वाडीचे पोलीस पाटील दिनेश खोमणे, नीरा दूरक्षेत्रातील सहाय्यक फौजदार सुदर्शन  होळकर, पोलीस हवालदार राजेंद्र भापकर, पोलीस नाईक  हरिश्चंद्र  करे व महिला व पुरुष उपस्तीत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक महिलेला घरात व समाजात सुरक्षित रहाण्याचा हक्क आहे. आपला मानसीक, शाररीक  छळ करण्याचा कोणालाच अधिकार नाही. हिंसा सहन  केल्याने  व गप्प राहिल्याने हिंसा  थांबत नाही. उलट ती वाढत जाते. तुमचा छळ  होत असेल, मारहाण होत असेल तर त्याबद्दल मैत्रीण, माहेरची  माणसे, नातेवाईक, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते यांच्याशी बोलून त्यांची मदत घ्यायला हवी. छळ  अथवा मारहाण  होत असेल तर स्वतःला दोषी माणू नये. मदत घेण्यास उशीर करू नये घाबरू नये, आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत. म्हणून आत्महत्येचा प्रयत्न करू नये. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोला. या शिवाय यातून मार्ग निघणार नाही असे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies