सासवड दि.९
पुरंदर तालुक्यातील सुपे येथील विवाहित महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी २९
वर्षीय पिडीत महिलेने सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकणी सासवड
पोलिसात विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सासवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,सासवड नाजीक असलेल्या सुपे येथील महिलेला तिच्याच गावात राहणाऱ्या सुरेश जगताप या व्यक्तीने तुला तुझ्या कामाच्या ठिकाणी मोटार सायकलवर सोडतो असे म्हणून मोटार सायकलवर बसवले. त्यानंतर त्याने तिला कंपनीकडे न नेहता तिला बोपदेव रोडवर ओढ्या जवळ नेहून तिच्या कडे प्रेमाची मागणी केली. त्याच बरोबर तिच्या मानामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.या वरून या महिलेने सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबतचा अधिकच तपास पोलीस निरीक्षक अन्नासाहेब घोलप करीत आहेत .