*अखेर हॉटेल ताहिती सील.....!*
*रिपब्लिकन पक्षाच्या निवेदनाला यश.*
सासवड : दि.२५
पुरंदर तालुक्यातील बोपदेव घाटा नजीक असणारे हॉटेल ताहिती मध्ये अवैध रित्या हुक्का पार्लर सुरु होते. यामुळे या तालुक्यातील युवा वर्ग हुक्का या नशेच्या अधीन होउ नये. यासाठी सदरचे हुक्का पार्लर बंद करावे असे आशयाचे पत्र सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष पंकज धिवार यांनी दिले होते. या निवेदनाची तत्काळ दखल घेत सासवड चे पी आय आणासाहेब घोलप यांनी सदर हॉटेल वर कारवाई केली व तसा अहवाल उपविभागीय दंडाधिकारी दौण्ड - पुरंदर चे प्रमोद गायकवाड यांचेकडे पाठविला. त्यानुसार उपविभागीय अधिकारी यांनी सदरचे हॉटेल सील करण्याचे आदेश दिले. यावेळी कारवाई तलाठी सुधीर गिरमे, मंडलाधिकारी भामे व तलाठी खोत, चांदगुडे पोलिस यांनी या आदेशाचे पालन करत सदरचे हॉटेल सील केले.
या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.पोलिस प्रशासन व प्रांतधिकारी यांच्या या संयूक्तिक कारवाई मुळे तालुक्यात असे अवैध धंदे करण्यास कोणीच धजवनार नाही. आर पी आयचे तालुका युवाध्यक्ष स्वप्निल कांबळे व सासवड शहराध्यक्ष विकास देशमुख यांनी या कारवाई साठी सातत्याने पोलिस प्रशासनाशी पत्रव्यवहार केला.