कोरोनामुळे मांढरदेवी काळूबाईची यात्र रद्द
सातारा दि.१०
मांढरदेवी येथील काळुबाईची
यात्रा ही पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या यात्रापैकी एक आहे. महाराष्ट्रासह शेजारील
राज्यातून लाखो भाविक भेट देत असतात. परंतु, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मांढरदेव येथील काळूबाईची
यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पौष महिन्याच्या पौर्णिमेला
मांढरदेवी यात्रा भरते. ही देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असल्यामुळे
भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रसार पाहून राज्य सरकारने काही निर्बंध व
बंधने घातली आहेत. मांढरदेवी गडावर यात्रेला होणारी गर्दी पाहून मांढरदेव प्रशासनाने परिसरात १० जानेवारी ते १ फेब्रुवारी पर्यंत १४४ कलम लागू
करण्याचा निर्णय घेतला आहे. व १७ जानेवारी रोजी देवीचा मुख्य उत्सवही रद्द करण्यात
आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, देवीची पारंपरिक व विधीवत पूजा होणार आहेत.
दरवर्षी या यात्रेला लाखो भाविक भेट देत असतात.
देवस्थानचे ट्रस्टी व पुजारी अशा मोजक्याच मंडळींनी देवीचे पूजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
काळूबाईच्या यात्रेसाठी राज्य आणि परराज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात.
तसेच, या काळात
मंदिरात दर्शन घेण्यास भाविकांना मनाई आहे. भाविक किंवा स्थानिकांना मांढरदेवी
गडावर तंबू बांधण्यास किंवा पशू-पक्षांचा बळी देण्यासाठी प्रशासनाने मनाई केली
आहे.