भारतीय जनता पक्षाच्यावतीने सासवड येथे नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन
सासवड दि.२६
भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा यांच्या वतीने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात येतंय. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे बाबत केलेल्या वक्तव्याचा पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सासवड येथे जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर कामठे, तसेच युवा मोर्चा पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस अडवोकेट श्रीकांत ताम्हणे यांच्या नेतृत्वात सासवड येथील शिवतीर्थ चौकात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेश जी भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 25 जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करून नाना पटोले यांच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात. आला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदर कामठे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस आडवोकेट श्रीकांत ताम्हणे, पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती निलेश जगताप, सासवड शहराध्यक्ष साकेत जगताप, जेजुरी शहर कार्याध्यक्ष गणेश भोसले, कैलास जगताप, आनंद जगताप, हनुमंत साळुंखे, विकास कटके, किरण सोनवणे, नदीम इनामदार, किशोर घोरपडे, सूर्यकांत ननवरे, राम पोटरे आदी मान्यवर उपस्थित होते