अनाथांची माय हरपली ; सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराने निधन
सासवड दि.४
पुरंदर तालुक्यातील कुंभार वळण येथे अनाथ मुलांना सांभाळ करणाऱ्या व अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांचे आज पुण्यात दीर्घ आजाराने आज निधन झाले. त्या अनेक दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. सिंधूताई यांचे मांजरी येथील पुनर्वसन केंद्रात अनेक अनाथ मुले राहत आहेत.त्याच बरोबर पुरंदर तालुक्यातील कुंभार वळण येथे त्यांनी अनाथ मुलांचं सांभाळ करण्यासाठी अनाथ आश्रमही उभारला आहे. त्यांच्या जाण्याने ही अनाथ मुले पोरकी झाली आहेत. सिंधूताई या माई नावाने परिचित होत्या. अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या,आज दिनांक 4 जानेवारी रोजी रात्री ८ वाजता त्यांचं निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये त्यानिनाखेरचा स्वास घेतला, महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.