नीरा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती करण्यात आली साजरी.
नीरा दिनांक २३ जानेवारी
पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायत कार्यालयात आज दिनांक 23 जानेवारी रोजी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात तरुणाच्या मनात देश प्रेमाची ज्योत जागवणारे आणि या स्वतंत्र लढ्यात स्वतंत्र हिंदुस्थानची सेना उभी करणारे नेताजी सुभाष चंद्र भोष यांची जयंती साजरी करण्यात आलाय त्याच बरोबर संपूर्ण देशात हिंदुत्वाची ज्योत जागवणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली निरा येथील शिवसेनेचे कार्यकर्ते त्याचबरोबर पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती यांच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली पोलीस आउट पोस्ट चे पोलीस उपनिरीक्षक कैलास गुप्ता घर व पंचायत समितीचे माजी उपसभापती गोरखनाथ माने व शिवसेनेचे नीरा येथील कार्यकर्ते दयानंद चव्हाण,सुदाम बंदगर यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी केशव बंडगेर.सागर बागडे, रवि गायकवाड़ रणवीर खरात, पोलिस पाटिल राजेंद्र भास्कर, केतन चव्हाण, संग्राम घोने, सुशांत ढोक, गोपाल बंडगर, सिकंदर शेख, राजू पटने, सचिन गायकवाड़ इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.