कर्नलवाडीच्या उपसरपंचपदी भानुदास नामदेव वाघापुरे
यांची बिनविरोध निवड
नीरा दि.१०
पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भानुदास नामदेव वाघापुरे यांची निवड करण्यात आली आहे. आज दिनांक १० जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभे मध्ये ही निवड करण्यात आली.
कर्नलवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच
शोभा भालचंद्र निगडे यानी राजीनामा दिल्याने कर्नलवाडी येथील उपसरपंचपद रिक्त झाले
होते. आज दिनांक १० जानेवारी रोजी दुपारी सरपंच सुधीर निगडे यांच्या अध्यक्षते
खाली ग्रामचायातीची मासिक सभा संपन्न झाली. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य धनराज कोंडे
यानी या बाबतचा प्रस्थाव मांडला. याला दुसरे सदस्य विकास कर्णावर यांनी अनुमोदन दिले. यानंतर सर्वानुमते
हा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी
सरपंच सुधीर निगडे यांचेसह माजी उपसरपंच शोभा निगडे. चतुराबाई
गडदरे,सारिका निगडे, शोभा निगडे, ग्रामसेवक जयंद्र सुळ
इत्यादी उपस्थित होते.
निवडी नंतर ग्रामस्थांच्यावतीने
उपसरपंच भानुदास नामदेव वाघापुरे यांचा सत्कार
करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज निगडे, जगन्नथ खोमणे, दशरथ निगडे, लक्ष्मण वाघापुरे,
आण्णा वाघापुरे, जगन्नथ निगडे, दादा निगडे, पोपट निगडे, दत्ता गडदरे,
अर्जुन निगडे, शिवाजी निगडे आदी मान्यवर उपस्थित होते.