अज्ञात वाहनाच्या धडकेत सिंगापूर येथील एक जण ठार ; जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल
दि. ९
पुरंदर तालुक्यातील शोगापुर येथील शेतकरी अनिल नामदेव वाघमारे हे भाजी विक्रीसाठी सासवड येथे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.या प्रकरणी त्यांची पत्नी श्रीमती मिंनाक्षी अनिल वाघमारे यानी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम 279,304(अ),337,338,427, मोटर.वाहन.कायदा कलम 184,134,177 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत जेजुरी पोलिसांनी आज दिनांक 9 जानेवारी रोजी दिलेली माहिती अशी की,फिर्यादी मीनाक्षी वाघमारे यांचे पती अनिल नामदेव वाघमारे हे भाजी विक्री करणे साठी डिओ होन्डा मोटारसायकल नंबर एम.एच.14 बी.वाय.5556 हीचे वरून सिंगापुर वरून सासवड कडे जात असताना पारगाव गावचे हद्दीत सिंगापुर सासवड रोडवर अर्जुन बाबुराव कोर्ले यांचे प्लॉटिंग नंबर 358 चे समोर सासवड बाजुकडुन सिंगापुर बाजुकडे जाणा-या अज्ञात चार चाकी वाहनावरील अज्ञात चालकाने रसत्याचे परिस्थिकडे दुर्लक्ष करून हयगईने भरधाव वेगाने चारचाकी गाडी चालवुन त्यांचे पती चालवत असलेल्या मोटारसायकलला ठोस देऊन तिचे वरील त्यानंचे पती अनिल वाघमारे यांना गंभीर व किरकोळ जखमी केले व त्यांचे मुत्युस कारणीभुत होऊन मोटार सायकलचे नुकसान केले. अपघाताची खबर न देता तो तेथुन निघुन गेला. अशा प्रकारची फिर्याद त्यानिंडीली आहे. याबाबतचं अधिकचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस हवालदार मुत्तनवार हे करीत आहे.