नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली नीरा व वाल्हा येथील पत्रकारांची आरोग्य तपासणी
नीरा दि.६
मराठी पत्रकार परिषदेच्या ८३व्या वर्धापनदिना निमित्त पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना परिषदेचे विश्वस्थ एस.एम.देशमुख यांनी दिल्या होत्या. त्यास अनुसरून नीरा प्रेस कल्बच्यावतीने पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज दि.६ डिसेंबर रोजी ही आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. समिक्षा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी सर्व तपासण्या केल्या. यामध्ये रक्ताची तपासणी, रक्तगट, H.B A1c, थायरॉईड, शुगर,लिपिड प्रोफाईल यांसह इतर तपासण्या करण्यात आल्या. हे रक्त नमुने बारामतीच्या मंगल लँब येथे पाठवण्यात आले आहेत. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक बाप्पु भंडलकर, आरोग्य सेवीका बेबी तांबे, परिचारक सचिन गायकवाड, लँब अँसिस्टन अमित चव्हाण, सत्वशिला बंडगर यांनी आरोग्य शिबीर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. नीरेचे उपसरपंच राजेश काकडे यांनी यावेळी आरोग्यमय शुभेच्छा दिल्या व नाष्टाची सोय केली.
यावेळे नीरा प्रेस क्लबचे जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ननवरे, पुणे जिल्हा सोशल मिडियाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य रामदास राऊत, विजय पवार, सोशल मिडियाचे सचिव स्वप्नील कांबळे, सोशल मिडियाचे कार्यकारणी सदस्य समिर भुजबळ, एम. एम. अतार, महावीर भुजबळ, श्रद्धा जोशी, सुरज अतार, सुभाष जेधे आदी उपस्थित होते. मराठी पत्रकार परिषदेचे पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.