नीरा येथे कर्नाटक महामंडळाच्या बसमध्ये प्रवास दरम्यान झाली महिलेची प्रसूती. महिलेने दिला मुलाला जन्म
नीरा. दि.२४
कर्नाटक येथील देवदुर्ग येथून महाराष्ट्रातील पुणे येथे निघालेल्या महिलेची प्रवास दरम्यान प्रसूती झाली आहे. प्रसूती नंतर ही महिला आणि तिच्या नवजात मुलाला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून ती महिला आणि नवजात मुलाची तब्बेत चांगली असल्याचे नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रातून सांगण्यात आले आहे.
याबाबत प्रत्यक्षदर्शी सहप्रवाशांनी दिलेली माहिती अशी की,ज्योती सोमनाथ चव्हाण ही २० वर्षीय महिला पुणे येथील भोसरी येथे तिचा पतीसह राहते.ती बाळंतपणासाठी कर्नाटक मधित मानवी तालुक्यातील मुरामपूरतांडा येथे आपल्या वडिलांकडे गेली होती.तेथील डॉक्टरांनी डिलिव्हरी सिजेरियन पद्धतीने करावी लागेल असे सांगितले होते .त्यामूळे तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे आणण्याच्या सल्ला तिच्या पुणे येथे राहणाऱ्या पतीने तिच्या वडिलांना दिला होता.काल रात्री ही बस देवदुर्ग येथून पुण्याकडे रवाना झाली. यामधून ही महिला प्रवास करीत होती.त्यावेळी तिला प्रसव काळा सुरू झाल्या होत्या.
आज दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजलेच्या दरम्यान सातारा जिल्ह्यातील लोणंदच्या पुढे आल्यावर नीरा जवळ तिला जास्तीचा त्रास होऊ लागल्याने बस मधील इतर महिलांनी पुढाकार घेऊन तिची प्रसूती केली .दरम्यान बस चालकाने १०८ ला फोन करून ॲम्बुलन्स बोलावली. यानंतर या महिलेला नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टर समीक्षा कांबळे यांनी महिलेवर उपचार केले. त्यांना ज्योती साळवे, योगिता टिळेकर यानी मदत केली.यावेळी कर्नाटक परिवहन चे चालक वाहक व बस मधील प्रवाशांनी सहकार्य करून ही प्रसूती निर्धोकपणे पार पाडण्यास मदत केली. बसमधील सह प्रवाशी लक्ष्मी पवार,नागेश्वरी पवार, रिरेमा राठोड,यांनी ही प्रसूती यशस्वी पणे केली आहे.