Type Here to Get Search Results !

केंद्र सरकारांने कितीही त्रास दिला तरी राज्य सरकार केंद्र सरकार समोर झुकणार नाही : शरद पवार

 

 


केंद्र सरकारांने कितीही त्रास दिला तरी राज्य सरकार केंद्र सरकार समोर झुकणार नाही : शरद पवार

पिंपरी चिंचवड  दि.१७  

       केंद्र सरकार राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते आहे. केंद्राच्या ताब्यातील विविध यंत्रणाच्या माध्यमातून राज्य सरकारला धारेवर धरल जाते आहे. राज्याचा कोट्यावधीचा जीएसटी केंद्राने दिला नाही.राज्याच्या विकासाला पैसे कमी पडावे आणी राज्यसरकार अडचणीत यावे म्हणूनच अस केल जात आहे .पण केंद्राच्या कोणत्याही दबावापुढे राज्य सरकार  झुकणार नसल्याच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यानी म्हटलंय.

        पिपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पारपडला यावेळी शरद पवार यानी केंद्राच्या अडवणूकीच्या धोरणाचा समाचार घेतला. पवार म्हणाले की,महागाई मुळे देशातील जनता मेटाकुटीला आली आहे. पेट्रोल डीजेलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांना महागाईच्या रुपाने सोसावा लागतो आहे. केंद्राने पेट्रोल डीजेलचा कर कमी केला तर जनतेला त्याचा मोठा आधार होईल.पण अस काही न करता सरकार दुसऱ्या पक्षाच्या ताब्यातील राज्य सरकार अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्र करते आहे.

       केंद्राच्या कामगार विषयक धोरणावरही त्यानी टीका केलीय.आम्ही सत्तेत असताना कारखानदारी टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र कधीही कामगारांना वाऱ्यावर सोडले नाही. कामगारांचे हित डोळ्या समोर ठेऊनच काम केले मात्र आता कामगारांना कामावरून काढून टाकले जात आहे. कामगारांच्या नोकऱ्या अडचणीत आल्या आहेत. अस सरकार किती काळ टिकणार? लोक हिताच्या निर्णयाला केंद्र सरकार बगल देत आहे.असे ही पवार म्हणाले.केंद्राच्या विविध तपास यंत्रणा राज्यातील नेत्यांच्या मागे लावून केंद्र सरकार एक प्रकारचा दबाव टाकत आहे पण राज्य सरकार त्यापुढे कोणत्याही प्रकारे झुकणार नसल्याच पवार यांनी ठणकावून  सांगितले.   

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies