सासवड येथे अवैध मटका चालवल्या प्रकरणी दोघांवर
कारवाई
सासवड दि.२७
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे अवैधरित्या ऑन लाईन मटका चालवणाऱ्या दोघांविरोधात सासवड पोलिसांनी कारवाई केली आहे .या प्रकरणी पोलिसांनी
सागर राजेंद्र चौखंडे, व अमित राजेद्र म्हेत्रे, यांना ताब्यात घेतले आहे.त्यांच्यावर मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सासवड येथील बैल बाजार येथील जय गणेश पान टपरीचे समोर सार्वजनिक ठिकाणी,दोन व्यक्ती ऑनलाईन मटका चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सासवड पोलिसांनी
काल दिनांक २६/१०/२०२१ रोजी ५.३० वा. चे सुमारास सासवड गावचे हद्दीत बैल बाजार समोर असलेल्या जय गणेश पान टपरीचे समोर सार्वजनिक ठिकाणी धाड टाकली असता ,सागर राजेंद्र चौखंडे, वय.२९ वर्ष, रा.नेताजी चौक, सासवड, ता. पुरंदर, जि.पुणे. व अमित राजेद्र म्हेत्रे, वय.२८ वर्ष, रा.नेताजी चौक, सासवड, ता. पुरंदर, जि.पुणे.हे कल्याण नावाचा मटका जुगार मोबाईलमधील व्हॉटसअप अँप्लीकेशन च्या माध्यमातून चालवत असल्याचे आढळून आले.मोबाईलच्या माध्यमातून ते मध्ये वेगवेगळया ओळखीचे ग्राहकांचे नंबरवरून कल्याण मटक्याचे आकडे देवाणघेवाण करीत होते. त्यांच्याकडे रोख रक्कम व मोबाईल फोन व साहित्य असा एकुण १४.५०० रुपयाचा मुददेमाल मिळून आले आहे.
या प्रकरणी पोलीस नाईक लियाकतअली युनूस मुजावर यांनी फिर्याद दिली असून या घटनेचा अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पोटे करीत आहेत.