वाल्हे येथे मसनेर देवाची यात्रा झाली उत्साहात संपन्न
वाल्हे दि.२१
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे मसनेर देवाची यात्रा उत्साहात पार पडली. दोन दिवस चाललेल्या या यात्रेची आज दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी सांगता करण्यात आली. कोरोनामुळे गेली दोन वर्षे सलग ही यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र घटस्थापनेच्या वेळेस शासनाने मंदिरे उघडण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आज ही यात्रा उत्साहात संपन्न झाली.
वाल्हे येथे असलेल्या मदनेवस्ती येथील व कामठवाडी येथील मसनेर मंदिरात मध्ये काल रात्री रात्रभर छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. सकाळी देवाची विधिवत पुजाआर्चना करण्यात आली व लगर तोडण्याचा कार्यक्रम ही घेण्यात आला. सायंकाळी पुन्हा ढोल, ताशा, सनईच्या तालावर गुलालाची मुक्त उधळण करीत, 'मसनेर देवाचे चागंभले' नावाचा गजर करीत भाविकांनी यात्रेचा आंनद लुटला.
यावेळी दादासो मदने, पोपट मदने, भाऊसो मदने, लक्ष्मीण मदने, ज्ञानेस्वर मदने, शिवा मदने, भिवा मदने, सागर मदने, संतोष मदने, धनंजय मदने, यासह समाजातील सर्व भाविक भक्तांनी यात्रेच आंनद घेतला.
प्रसंगी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, बारामती लोकसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष अजिंक्य टेकवडे, ओबीसी सेलचे अशोक बरकडे, उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष संदेश पवार, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ, हनुमंत पवार, अभी दुर्गाडे यांच्यासह अनेक मान्यवरांसह, ग्रामस्थांनी मसनेर देवाचे दर्शन घेतले.