आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषी जयंती निमित्ताने हजारो कोळी बांधवासहित वाल्हेकरांनी घेतले वाल्मिकी समाधीचे दर्शन.
वाल्हे (दि.२०)
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी आद्यरामायणकार महर्षि वाल्मिकी ऋषींची जयंती येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.आज हजारो कोळी बांधव व वाल्हेकर नागरिकांनी वाल्मीक ऋषींचे दर्शन घेतले.
मागील तेरा वर्षांपासून,महाराष्ट्र कोळी समाज संघ व वाल्हेकर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने वाल्मिकी जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने राज्यातील कोळी बांधव मोठ्या संख्येने येऊन, या ठिकाणी मेळावा घेतात. व आपल्या मागण्या शासन दरबारी मांडतात.मात्र, कोळी समाजाचे नेते, महाराष्ट्र राज्य कोळी महासंघाचे माजी अध्यक्ष, अनंत तरे यांचे निधन झाल्यामुळे, यवर्षी मेळावा रद्द करुन समाधी स्थळी विधिवत पुजा - अर्चा करुन हभप चेतन महाराज शिंदे यांचे फुलाचे कीर्तन करण्यात आले. व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रथम स्वर्गीय अनंत तरे यांना सर्वांच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. व नुतन अध्यक्षपदी निवड झालेले अनंत तरे यांचे सुपुत्र, जयेश तरे यांना समाजाची पुढची दिशा देण्याचे काम त्यांच्या हाती सोपवण्यात आले.यावेळी जयेश तरे म्हणाले समाजाचे प्रश्न व वाल्मिकी मंदीर विकास करण्यासाठी स्थानिकांना बरोबर घेऊन, विकास करु.
तसेच कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी अनंत तारे यांच्या आठवणी सांगत याठिकाणच्या स्थानिकांना व कोळी बांधवांना बरोबर घेऊन, लवकर ट्रस्टची स्थापना करुन, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप व माजी आमदार विजय शिवतारे यांच्या माध्यमातून, यातिर्थ क्षेत्राचा विकास करण्याचे अश्वासन दिले.
यावेळी, महाराष्ट्र राज्य कोळी समाज संघाचे उपाध्यक्ष अरविंद चिव्हे, वाल्मिकी जयंती उत्सव समिती प्रमुख शामराव अधटराव, सचिव मदन भोई , प्रल्हाद कदम, पोपट बेसके, मल्लू शेठ कोळी, संजय रोकडे, राष्ट्रवादीचे पुष्कराज जाधव, हभप माणिक महाराज, हभप अशोक महाराज पवार, संदेश पवार, प्रकाश कड, हनुमंत पवार, किरण गदादे, राजेंद्र रोकडे, अभि दुर्गाडे आदिसह अनेक कोळी बांधव उपस्थित होते.