सासवड एसटी आगाराच्या नीरा ते स्वारगेट अशा वाढीव फेऱ्या सुरु.
नीरा- सासवड -स्वारगेट दरम्यान पीएमपीएल प्रमाणे एस टी देणार सेवा.
नीरा : दि.८
नीरा ते हडपसर या मार्गावर पी.एम.पी.एल.ची बस सेवा चार महिण्यापुर्वी सुरु झाली. आता एसटी महामंडळ व पी.एम.पी.एल प्रशासनामध्ये झालेल्या स्पर्धात्मक वादामुळे पी. एम. पी. एल बस सेवा बंद करण्याच्या भुमिकेत असतानाच, सासवड एसटी आगाराने नव्याने नीरा ते पुणे या मार्गावर बसच्या फेऱ्या वाढवून, आज दि ८ जून पासून दर तासाला एक शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. पुढील काळात दर आर्ध्या तासाला स्वारगेट-नीरा-स्वारगेट बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.तर मागणी असेल त्या गावखेड्यात थांबा देत 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रिद खरे करण्याचा प्रयत्न राज्य परिवहन करणार आहे.
नीरा ते स्वारगेट बस सेवा सुरु करण्याच्या मागणीला विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड व विभागीय वाहतुक अधिकारी ज्ञानेश्वर ननवरे यांनी नुक्ताच हिरवा कंदील दिल्याने नीरा ते स्वारगेट १६ व स्वारगेट ते नीरा १५ फेऱ्यांची बस सेवा बुधवार दि. ०८ जुन पासून सुरू करण्यात आल्याची माहिती सासवड स्थानक प्रमुख इसाक सय्यद यांनी दिली आहे
सासवड, जेजुरी, नीरा या भागातील नोकरदार, व्यावसायिक, पर्यटक, विध्यार्थ्यांना पुणे शहरात सतत ये-जा करावी लागते. प्रवासावेळी लांब पल्याच्या एसटी बस लहान गावखेड्यात व वाड्यावस्त्यांवर थांबत नाहीत. नीरा शहरातून लांबपल्याची बस निघाल्यावर बस वाल्हे, जेजुरी, सासवड या स्थानकां शिवाय मध्ये थांबणार नाही असे वाहक नेहमी सांगत. रात्री अपरात्री पुण्याहून घरी येताना पुढच्या स्थानकाचे टिकीट काढले तरी गावखेड्यात बस थांबत नसे. त्यामुळे या गावखेड्यातील प्रवाशांचे मोठे हाल होत असत. नीरा हडपस या पी.एम.पी.एल बस सेवेने याभागातील प्रवाशांची चांगली सोय केली होती.
कोट
"पी.एम.पी.एल बसने जशी सेवा दिली त्याच पद्धतीने सासवड एसटी आगाराने ही आता कंबर कसली आहे. प्रवाशांना विनम्र व मागणी असेल तेथे थांबा अशी सेवा दिली जाईल. दिव्यांग, जेष्ठ नागरीक, शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थी यांना सवलतीची सोय असणार आहे. प्रवाशांनी या बस सेवेला सहकार्य केल्यास पुढील काळात दर आर्ध्या तासाला स्वारगेट नीरा बस सेवा सुरू करण्याचा मानस आहे"
मनिषा इनामके आगार व्यवस्थापक, सासवड.
वेळापत्रक.
नीरा ते स्वारगेट (पुणे) एका बाजूने एकुण १६ फेऱ्या
नीरा येथून पहिली बस सकाळी ०६:००, ०७:१५, ०७:४५, ०८:१५, १०:१५, १०:४५, ११:१५, दुपारी १२:१५, १२:४५, ०२: ४५, ०३:४५, ०४:१५, ०४:४५, ०५:१५, ०६:१५, रात्री ०८:१५, ०८:४५
स्वारगेट येथून पहिली बस सकाळी ०८:००, ०८:३०, ०९:३०, १०:००, १०:३०, दुपारी १२:३०, ०१:००, ०२:००, ०२:३०, ०३:००, ०४:१५, ०४:४५, सायंकाळी०५:००, ०५:३०, ०६:००