भोर येथे खिशातून पैसे काढल्याच्या रागातून झालेल्या हाणामारी एक ठार
भोर बसस्थानका जवळ असणाऱ्या स्मशानभूमीमधील पत्राशेड मध्ये खिशातून पैसे काढल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात हाणामारी होऊन अक्षय कन्हैया गायकवाड (वय३२) रा. भोर हा गंभीर जखमी होऊन मयत झाल्याची खळबळजनक घटना घडला
भोर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अक्षय गायकवाड व आरोपी देवराम लक्ष्मण माने रा. नारायणपूर ता. पुरंदर या दोघांमध्ये भोर बस स्टँड येथील स्मशानभूमी शेजारील पत्रा शेडमध्ये मद्य पित बसले होते. खिशातील पैसे काढून का घेतले या कारणावरून दोघांमध्ये वाद होऊन जोरदार हाणामारी झाली .यात आरोपी माने याने अक्षयच्या छातीवर व गुप्त अंगावर मोठे दगड मारल्याने अक्षय मोठ्या प्रमाणावर जखमी झाला होता.
अक्षय यास त्याच्याच भावाने भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना भोर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे, पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, विकास लगस, दत्तात्रेय खेंगरे, अतुल मोरे, नवले, शिवाजी काटे, गणेश कडाळे, प्रियंका जगताप, गृहरक्षक दल भीमराव रणखांबे व आकाश सागळे यांनी सापळा रचून भोर- पुणे मार्गावरील भोलावडे येथील पेट्रोल पंपाजवळ अटक केली. याप्रकरणी पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत.