Type Here to Get Search Results !

पुणे पंढरपूर मार्गावर वाल्हे येथे मोटर सायकल व टँकरच्या अपघातात एकाचा मृत्यू त एक जण जखमी

 पुणे पंढरपूर मार्गावर वाल्हे येथे मोटर सायकल व टँकरच्या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी

    


वाल्हे दि.१७

 

   पुरंदर तालुक्यातील पुणे पंढरपूर  महामार्गावर वाल्हे जवळ दातेवाडी फाट्याजवळ  टँकर व मोटारसायकल यांच्या अपघातात वाल्हे येथील एकाचा मृत्यु झाला आहे.


      याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की काल दिनांक १६ ऑक्टोबर रोजी रात्री  सात वाजलेच्या सुमारास दातेवाडी फाट्याजवळ हा अपघात घडला आहे.वाल्हे येथील दशरथ सुभाष भुजबळ व त्यांचे पाहुणे  नागेश बबन बारवकर दोघे  त्यांच्या मोटर सायकलवरून जेजुरीकडे जात होते.दातेवाडी फाट्या जवळ आले असता, ते रस्त्यात उभ्या असलेल्या टँकरला पाठीमागून ड्रायव्हरच्या बाजुला धडकले. यामध्ये नागेश बारवकर यांच्या छातीला जोरदार मार बसला या मध्ये ते गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी जेजुरी येथे रुग्णालयात नेले असता.उपचार पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. टँकर चालकाने टँकरच्या पाठीमागच्या बाजूला कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर न लावल्याने तो टँकर मोटारसायकल चालकास दिसून आला नाही आणि यातूनच ही धडक झाली. या कारणाने फिर्यादी दशरथ भुजबळ यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.  पोलिसांनी टँकर क्रमांक एम एच ४६ बी एफ ३९४६ च्या अज्ञात चालक विरोधात भारतीय दंड विधान कलम  २७८अ, ३३७,३३८,मोटर वाहन कायदा कलम 

१८४,१३४  नुसार गुन्हा दाखल केला आहे.

          या बाबतचा अधिकचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष मदने करीत आहेत. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies