छत्रपतींचा अवमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व इतरांचा जेजुरीत निषेध
राज्यपाल चले जावच्या दिल्या घोषणार : वाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा..
जेजुरी ता. पुरंदर ) येथे शिवप्रेमींच्यावतीने राज्यपाल भगासिंग कोश्यारी आणि छत्रपतीचा वारंवार आपमन करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड, मंत्री मंगल प्रभात लोढा, भाजप प्रववक्ता सुभांधू त्रिवेदी या नेत्यांचं निषेध करण्यात आला...त्याच बरोबर चित्रपटाच्या माध्यमातून शिवरायांची बदनामी करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांचाही निषेध करण्यात आला. आज गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता जेजुरी येथील छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येत शिवप्रेमींनी निषेध व्यक्त केला. राज्यपालांना केंद्र सरकारने माघारी बोलावण्याची मागणी यावेळी करण्यात आली...त्याच बरोबर छत्रपतींची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला..
याबाबतचं एक निवेदन पोलिसांना देण्यात आले....
यावेळी राष्ट्रवादीचे जयदीप बारभाई, संभाजी ब्रिगेडचे संदीप जगताप, लोकेश सावंत,बापू भोर, महेबुबभाई पानसरे, सचिन सोनवणे, अजिंक्य देशमुख यांच्यासह अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.