पुणे पंढरपूर मार्गावरील वाल्हे - निरा दरम्यानचे रेल्वे फाटक वाहतुकीसाठी करण्यात आले खुले
आषाढी यात्रेला पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांचा ४० किमीचा वळसा वाचला
नीरा दि.१०
पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे - मिरज या मार्गावरील वाल्हे निरा दरम्यान थोपटेवाडी येथे असलेल्या रेल्वे फटका मधील लोह मार्गाच्या दुरुस्तीचे काम रेल्वे विभागाकडून करण्यात येत होतं. त्यामुळे पुणे पंढरपूर ही वाहतूक जेजुरी मोरगाव निरा अशी वळविण्यात आली होती. दोन दिवस या हे काम सुरू असल्याने पंढरपूरला जाणाऱ्या लोकांना चाळीस किलोमीटरचा जवळचा मारावा लागत होता . मात्र रेल्वे विभागाकडून आज (दि.९) संध्याकाळी संपूर्ण काम करण्यात आले असून हे फाटक आता पुन्हा वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला आहे आज या मार्गावरून पंढरपूरला गेलेले अनेक वाहने पुण्याकडे जाणार आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांनी व वारकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले मात्र या कालावधीमध्ये प्रशासनाने योग्य ती खबर न घेतल्याने पंढरपूरला जाणाऱ्या लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवस लोकांना प्रचंड अडचणीला सामोरे जावे लागले.