Type Here to Get Search Results !

फसवून जमीन खरेदी केल्या प्रकरणी तालुक्यातील बड्या नेत्याच्या विरोधात फिर्याद

 मनोविकलांग मुलाकडून जमीन खरेदी प्रकरणी आईची एका पक्षाच्या अध्यक्षा सह एजंटा विरोधात सासवड पोलीसातत फिर्याद



तक्रार खोटी असल्याचा जगदाळे यांचा आरोप.


सासवड दि.१०


             पुरंदर तालुक्यातील भिवरी येथे मुलाच्या  मनोविकलांगतेचा गैरफायदा घेत आईच्या परस्पर जमिनीची खरेदी केल्या प्रकरणी त्या मुलाच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी रजनी महादेव घाटे वय 60 वर्षे ,  रा.पठारवाडी, पो.भिवरी, ता.पुरंदर, जि.पु. यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल आहे . 

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  फिर्यादी यांचा  मोठा मुलगा संदीप हा पुण्यात राहतो. दुसरा मुलगा दिपक हा अहमदाबाद येथे वास्तव्यास आहे आणि  त्यांचा  लहान मुलगा अमित हापॅरा नाॅईडषिझोफ्रेनियाचा पेशंट आहे. व तो गेले 5 ते 6 वर्षे परागंदा आहे. फिर्यादी यांनी  सन १९९४  साली लहान मुलगा अमित याचे नावे तो आठ वर्षाचा असतान भिवरी येथे गटनं. 5142 मध्ये क्षेत्र 2 हेक्टर 73 आर त्याचे नावे घेतली होती. ही फिर्यादी यांनी  नुकतेच या मिळकतीचे 7/12 उतारे काढल्याने  सदर मिळकतीचे 7/12 वरती संदीप जगदाळे या त्यांच्या  नातेवाईकांचे नाव आढळून आले.  तद्नंतर ऑनलाईन सुची क्र. 2  काढले असता त्यामध्ये संदीप जगदाळे यानी सदर मिळकती पैकी 80 आर मिळकत खरेदी घेतल्याचे आढळून आले. सदर खरेदी खताचा दस्तक्र. 46252021 असा आहे. फिर्यादी यांनी त्याना त्याचा जाब विचारला असता त्यानी तुमचा भाऊबंदा पैकी असलेले एजेंट प्रथमेश घाटे याच्या मध्यस्तीमुळे खरेदी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. एजेंट प्रथमेश घाटे व संदीप जगदाळे याना  फिर्यादी यांचा  मुलगा अमित मनोविकंलाग असल्याचे माहीत असून देखील गट नं. 5142 या मधील 80 आर अन्वये खरेदी दस्त केला आहे. 


 संदीप मारूती जगदाळे रा. गराडे, ता.पुरंदर, जि.पुणे व प्रथमेश आनंद घाटे रा. पठारवाडी, ता.पुरंदर, जि.पुणे यानी स्वतःच्या फायदया करीता फिर्यादी यांच्या  ताबे वहीवाटीतील असलेली मिळकत त्यांचा  मुलगा याचे मनोविकलांगतेचा गैरफायदा घेवून तसेच त्याला  कायदेशीर गोष्टीची  कोणतीही समज नसल्याचे माहीत असताना स्वतःचा वैयक्तिक बेकायदेशीर फायदयासाठी फसवणूक करून खरेदी केली आहे. म्हणून  सासवड पोलिसात  तक्रार दाखल केली आहे. सासवड पोलिसांनी  याबाबत भा.द.वि.कलम  420 ,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास सहा . पोलिस निरीक्षक विनोद महांगडे हे करीत आहेत . 


तक्रार खोटी असल्याचा जगदाळे यांचा आरोप.


    दरम्यान संदीप जगदाळे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत त्यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले ही तक्रार चुकीची आहे.ज्याच्याकडून त्यानीं जमीन खरेदी केली तो मनोरुग्ण नाही.तो ट्रक चालक आहे.त्याच्याकडे वाहन परवाना आहे.त्याला पैशाची गरज होती म्हणून त्याने मला ती जमीन विकली आहे.त्याच्या नातेवाईकांनी विचारांना केल्यानंतर माझे पैसे द्या आणि जमीन परत घ्या असे म्हटले होते. मात्र त्यांनी तसे ना करता.पोलिसात खोटी तक्रार दिली आहे.सबंधित विक्री करणाऱ्या व्यक्तीला लवकरच माध्यमांसमोर आणून सत्य पुढे मांडणार असल्याचे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies